पिंपरी चिंचवड: पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या नवऱ्याची आत्महत्या; पत्नीस अटक
(Archived, edited, symbolic images)

पत्नीच्या छळाला (Wife's Harassment)कंटाळलेल्या एका पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे घडली आहे. जय तेलवाणी असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर, तृप्ती तेलवाणी असे पत्नीचे नावा आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पत्नी तृप्तीला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जयने 13 नोव्हेंबर राजी आत्महत्या केली होती. त्यानंतर जयच्या कुटुंबीयांनी सुनेच्या त्रासाला कंटाळूनच जयने आत्महत्याच्या केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तपास करत पोलिसांनी पत्नी तृप्तीला अटक केली आहे. (हेही वाचा, छेडछाड करुन आरोपींनी महिलेला जिवंत जाळले, दोघांना अटक)

जयच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तृप्तीला सतत पैसे खर्चायची सवय होती. त्यामुळे ती जयकडे पैशाचा सतत तगादा लावायची. तिला पैसे पुरवण्यातून जय कर्जबाजारी झाला होता. तीरीही तिची सवय सुटत नव्हती. जयने पैसे द्यायला नकार दिल्यास ती त्याला मारहाण करत असे. तसेच, स्वत:च्या जीवाचं काही बरं-वाईट करण्याची धमकीही देत असे. विवाह झाल्यानंत सुरुवातीची ४ वर्षे जय आणि तृप्तीचा संसार छान चालला होता. त्यांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. दरम्यान, मार्च 2018पासून तृप्तीने जयकडे पैशासाठी अधिकच तगादा लावायला सुरुवात केली, असे जयच्या कुटुंबियांनी तक्रारीत म्हटले आहे.