छेडछाड करुन आरोपींनी महिलेला जिवंत जाळले, दोघांना अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशात एका विवाहित महिलेने छेडछाड करण्यासाठी विरोध केल्याने तिला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिला गंभीरपणे भाजली आहे.

सीतापूर येथे एक महिला शौचालयासाठी शेतामध्ये जात होती. तेव्हा गावातील दोन तरुणांनी तिचा रस्ता अडवून तिची छेडछाड करण्यास सुरुवात केली. मात्र महिलेने या प्रकरणी विरोध केला असता तिला या दोन तरुणांनी प्रथम पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेच्या घरातील मंडळींनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र दुसऱ्यांदा पुन्हा याच दोन आरोपींनी तिच्यावर तेल टाकली आणि आग लावून दिली.

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर पोलिसांनी हलगर्जीपणा दाखविल्याने चार पोलिसांना कामावरुन निलंबित करण्यात आले आहे.