Cyber Awarness: समाजमाध्यम, डेटिंगसाईटवरील अनोळखी महिला कशाप्रकारे लोकांची फसवणूक करतात? ठाणे पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Image Used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांपुढे या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषत: फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या प्रचलित समाजमाध्यमांचा वापर करून केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सामजमाध्यम (Social Media) आणि डेटिंगसाईटवरील (Dating Sites) अनोळखी महिलांकडून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी (Thane Police) नागरिकांना दिला आहे. तसचे या महिला कशाप्रकारे लोकांची फसवणूक करतात? याचीही माहिती त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.

समाजमाध्यमावर मैत्री असलेल्या महिला अथवा डेटिंग ऍपवरद्वारे ओळख झालेल्या महिला बिभत्स व्हिडिओ पाठवून फसवणुक करत असल्याच्या घडना घडत आहेत. संबंधित महिला सुरुवातीला काही काळ ऑनलाईन प्रेमाचे संवाद करून ओळख वाढवतात. काही दिवसानंतर बिभत्स व्हिडिओ/ फोटो पाठवण्यास सुरुवात करतात. त्यानंतर नागरिकांना व्हिडिओ कॉल करून त्याचे खाजगी फोटो/ व्हिडिओ पाठवण्यास प्रेरित करतात. पाप्त झालेले खाजगी फोटो/ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत संबंधित व्यक्तीकडून पैशाची मागणी करुन त्यांना ब्लॅकमेल केले जाते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. हे देखील वाचा-Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा

ठाणे पोलिसांचे ट्वीट-

नागरिकांनी सामजमाध्यम किंवा डेटिंगसाईटद्वारे ऑनलाईन मैत्री असलेल्या अनोळखी महिलांनी पाठवलेल्या बिभत्स फोटो किंवा व्हिडिओ यांना प्रतिसाद देऊ नये व त्यांच्याशी ऑनलाईन प्रमाचे संवाद साधताना दक्षता घ्यावी, असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे.