महाराष्ट्रात प्रवासासाठी पुन्हा एकदा लागणार E-pass; कसा कराल अर्ज? जाणून घ्या
e-pass for Covid-19 Lockdown (Photo Credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 'ब्रेक द चेन' (Break The Chain) अंतर्गत आंतरजिल्हा प्रवासाला बंदी असून जिल्हांतर्गत प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल (गुरुवार, 22 एप्रिल) रात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले असून ते 1 मे पर्यंत कायम राहणार आहेत. मात्र महत्त्वाच्या आणि खाजगी कारणांसाठी प्रवासाची मुभा देण्यात आली असून त्यासाठी ई-पास असणे आवश्यक असणार आहे. तसंच नागरिकांनी ई-पास (E-Pass) वापरुनच प्रवास करावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मागील वर्षी देखील कोरोना व्हायरस लॉकडाऊन कालावधीत प्रवासावर कडक निर्बंध असल्यामुळे ई-पासची तरतूद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता भासणार आहे. तर जाणून घेऊया अत्यावश्यक कारणासाठी ई-पास कसा मिळवाल?

# ई-पास काढण्यासाठी प्रथम https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळाला भेट द्या.

# त्यानंतर 'apply for pass here' या पर्यायावर क्लिक करा.

# जेथून तुम्ही प्रवास करणार आहात तो जिल्हा निवडा.

# आवश्यक कागदपत्रं जोडा.

# प्रवासाचं कारण नमूद करा.

# अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी मिळेल. तो सेव्ह करुन ठेवा. त्या आयडी वरुन तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.

# प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करा.

ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासची वैधता कालावधी आणि क्युआर कोड मेन्शन असेल. प्रवास करताना पासची मूळ प्रत किंवा सॉफ्ट कॉपी जवळ बाळगणे आवश्यक आहे. दरम्यान, जवळच्या व्यक्तीचा लग्नसोहळा, अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठीच ई-पास दिला जात आहे. ऑनलाईन पद्धतीने ई-पास न मिळाल्यास जवळच्या पोलिस स्थानकाला भेट देऊन परवानगी मिळवावी.