कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) यंदा अनेक शालेय विद्यार्थ्यांसह अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. दरम्यान आज महाराष्ट्र एफवायजेसी ची दुसरी गुणवत्ता यादी (Maharashtra FYJC 2nd Merit List) जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची दुसरी गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. 11thadmission.org.in या संकेतस्थळावर तुम्हाला ही यादी सविस्तर पाहता येईल. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळाला (Website) भेट देऊन यावर गुणवत्ता यादीची माहिती मिळवता येईल.
महाराष्ट्र एफवायजेसीची दुसरी मेरिट लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला त्यासंबंधीची एक PDF फाईल दिली आहे. ज्यात सविस्तर माहिती दिली आहे. फॉर्म भरण्याची वेळ, फी भरण्याची तारीख, ऑनलाईन पेमेंट या सर्वांविषयी माहिती मिळेल.हेदेखील वाचा- CBSE Board Exams 2021 ऑनलाईन नव्हे तर लेखी परीक्षेच्या स्वरूपातच होणार; बोर्डाच्या अधिकार्यांची माहिती
FYJC ची मेरिट लिस्ट पाहण्यासाठी काय कराल?
1. सर्वात आधी 11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्या.
2. त्यानंतर आलेल्या होमपेजवरील उजवीकडील तुमचे प्रदेश निवडा.
3. त्यानंतर ‘Allotment list’ या पर्यायवर क्लिक करा.
4. तिथे तुमची माहिती भरा
5. सर्व माहिती भरल्यानंतर Search वर क्लिक करा
राज्य सरकाराने सर्व कोर्सेससाठी अॅडमिशन सुरु केले असून यात 12% SEBC कोट्याशिवाय हे प्रवेश प्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावरी माहिती नीट वाटून मगच फॉर्म भरा. फी बाबत, कॉलेजेसची यादी नीट तपासून घ्या. तुमची वैयक्तिक माहिती देखील अचूक भरा. व्याकरणाच्या चुका, Typo Error टाळा.