यंदा राज्यातील कोविड19 स्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला 14 मार्चपासून ऑफलाईन सोबतच ऑनलाईन माध्यमातूनही सुरुवात झाली आहे. मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाची सुरुवात झाली होती. यंदा मनसेने क्यू आर कोड जारी करत सदस्य नोंदणीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केले आहे. सध्या मनसेच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, क्यू आर कोड यंत्रणा तुमच्यासाठी नवीन असेल आणि सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होण्यासाठी नेमके काय करायचे? याची माहिती नसल्याने गोंधळ उडत असेल तर खालील व्हिडिओ तुम्हाला मनसैनिक होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या व्हिडिओत कशाप्रकारे सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे? यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वर्ष 2021 ते 2023 ह्या कालावधीसाठी सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. पक्षाचे सदस्य होण्यासाठी mnsnondani.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर कशाप्रकारे सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे ह्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे. हे देखील वाचा- MNS Registration: मनसे सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे शुभारंभ
मनसे ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठीची संपूर्ण प्रक्रिया-
मनसे सदस्य नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन नोंदणीसाठी पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधावा लागणार आहे. याशिवाय पक्षाकडून एक क्यूआर कोड जारी करण्यात आला आहे. यावर स्कॅन करूनही तुम्हाला मनसेचे सदस्य होता येणार आहे. हा क्यू आरकोड तुम्हाला वर्तमानपत्रातील जाहीरातीत, होर्डिंग्स किंवा समाज माध्यमांवर उपलब्ध होईल.