Pooja Tadas Accused Ramdas Tadas: भाजपचे रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, सुषमा अंधारेंच्या पत्रकार परिषदेत PM नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीसाठी याचना
Pooja Tadas PC TWITTER

Lok Sabha Election 2024:  देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी जाहिर झाल्या आहेत. ठिकठिकाणी प्रचार प्रसाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे. सध्या राजकारणात वर्धा लोकसभा मतदार संघ फार चर्चेत आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातून  (BJP)भारतीय जनता पक्षाने रामदास तडस यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांची सून पूजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पूजा तडस यांनी शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे आणि या परिषदेत त्यांनी तडप कुटुंबिवार गंभीर आरोप केला आहे. (हेही वाचा- आचारसंहिता काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये

पूजा तडस यांनी आज सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषद तडस कुटुंबिचे धक्कादायक खुलासे केले आहे. पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, "मला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागला आहे. माझ्या मुलाचे बाप कोण असा लज्जास्पद प्रश्न विचारण्यात आला आहे. स्वत: रामदास तडस यांनी मला डीएनए तपासण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं.  ज्या फ्लॅटमध्ये मी राहत होते तेथे फक्त मला उपभोगाची वस्तू म्हणून वागणूक दिली, त्यातून माझ्या बाळाचा जन्म झाला. हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कोणाचं आहे, या बाळाचा डीएनए कर असे आरोप लावण्यात आले. मला लोखंडी रोडने मारण्यात आलं. ज्या फ्लॅटमध्ये मी राहत होती तेथून मला आणि माझ्या 17 महिन्याच्या बाळाला बेघर करण्यात आलं. जर तुम्ही एका लहान मुलासोबत राजकारण करु शकता तर माझ्यासारख्या महिलांनी जायचं कुठे?''

पूजा तडस यांनी या संतापजनक घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यानंंतर शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या आक्रमक होऊन परिषदेत बोलल्या की, पूजा तडस या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहचल्यात. पंतप्रधानांनी महिलेला मदत करावी आणि भाजपने तडस यांची उमेदवारी रद्द करावी. मोदी का परिवार म्हणणाऱ्या भाजपाने मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती देखील केली.