महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. सध्या संपूर्ण भारतात 21 दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोना बाधीत रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे राज्य सरकारने जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राज्यातील तब्बल 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर (parole) सोडण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्याही औषधाची निर्मिती झाली नसल्यामुळे लोक अधिकच घाबरून गेले आहेत. परंतु, कोरोना हा बरा होणारा आजार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारंवार देत आहेत.
देशात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात तर परिस्थिती फारच अवघड होताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून 125 झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनिल देशमुख यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हणाले की, ” सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील 60 तुरूंगांतील जवळपास 11 हजार कैद्यांना तातडीने पॅरोलवर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी, अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Coronavirus चा सामना करण्यासाठी NCP ने घेतला महत्वाचा निर्णय; आमदार व खासदारांना ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे शरद पवार यांचे आदेश
अनिल देशमुख यांचे ट्वीट-
७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील
जवळ-जवळ
११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पारोल देण्याचे मी आदेश दिले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 26, 2020
भारतात आतापर्यंत 649 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर, 42 लोक यातून बरे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 125 वर पोहचली आहे. यापैकी 15 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत.