मुंबई मध्ये आज झालेल्या वादळी पाऊस आणि वार्यामुळे घाटकोपर (Ghatkopar) मध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व भागामध्ये पंतनगर नगर परिसरातील महत्त्वाच्या पेट्रोप पंप वर होर्डिंग कोसळले आहे. यामध्ये 35 पेक्षा अधिक जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनं होर्डिंगच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशामध्ये सध्या बचावकार्य सुरू असताना बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत पालिका आता Ego Media Advertising company आणि रेल्वे प्रशासनाविरूद्ध तक्रार दाखल करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल असे बीएमसी पीआरओ कडून सांगण्यात आले आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग .
बीएमसी नोंदवणार तक्रार
BMC will file a complaint against Railway and Advertising company Ego Media in the matter of the hoarding falling incident in Ghatkopar which injured at least 35 people. The complaint will be filed for registering FIR under the Disaster Management Act: BMC PRO https://t.co/iFVxcHBQ4R
— ANI (@ANI) May 13, 2024
मुंबई मध्ये घाटकोपर येथील दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती घेत या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिल्याचं X वर ट्वीट करत सांगितले आहे. सध्या मुंबई पोलिस, अग्निशमन दल, महानगर गॅस लिमिटेड, महानगरपालिका व इतरांचे मदतीने अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. सध्या घटनास्थळी NDRF ची देखील एक टीम तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया
Central Railway CPRO DR Swapnil Nila says, "The land on which the hoarding was erected belongs to the GRP. It doesn't belong to the central railway"
BMC will file a complaint against Railway and Advertising company Ego Media in the matter of the hoarding falling incident in… https://t.co/uQTe7YTytF
— ANI (@ANI) May 13, 2024
दरम्यान मध्य रेल्वेचे सीपीआरओ डॉ स्वप्नील निला यांनी यावर प्रतिक्रिया देताना, "ज्या जमिनीवर होर्डिंग उभारण्यात आले ती जागा जीआरपीची आहे. ती मध्य रेल्वेची नाही" अशी प्रतिक्रिया दिली आहे.