High Tide Timing in Mumbai: मुंबई मध्ये आज दुपारी 3.28 ला भरती, 4.47 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता- IMD
High Tide in Mumbai | Representational Image | (Photo Credits: PTI)

Mumbai High Tide 25th July 2020: काही दिवसांपासून गडप झालेल्या पावसाला मुंबईत (Mumbai) काल (24 जुलै) पासून सुरुवात झाली. काल मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यानंतर येत्या 24 तासांत मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच मुंबई मध्ये आज दुपारी 3.28 मिनिटांनी भरती येणार असून 4.47 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. भरतीच्या वेळेस नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यापासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सांताक्रूझ येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात 14 जुलै पर्यंत 822 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जुलै मध्ये अपेक्षित असलेला पाऊस 14 जुलै पर्यंत 60% पूर्ण झाला. दरम्यान मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी देखील पावसाचा जौर चांगला आहे. (महाराष्ट्रात येत्या 24 तासांत विदर्भ, मराठवाड्यासह मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता)

ANI Tweet:

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्य नागरिकही सुखावले आहेत. राज्यात पुढील दोन दिवसांत तुरळक पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून वारंवार होत असतं.