Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sonia gandhi | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

महाविकासआघाडीकडे 162 आमदारांचा आकडा असल्याचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेते माध्यमांना सांगताना होते. परंतु हा आकडा खरंच या तिन्ही पक्षांना गाठता येणार का असा प्रश्न राज्यातील संपूर्ण जनतेला पडला आहे. याचाच उत्तर आता थोड्याच वेळात मिळणार आहे कारण तिन्ही पक्षांचे आमदार पहिल्यांदाच एकत्र आलेले दिसणार आहे.

मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षचे मिळून 162 आमदार जमणार आहेत आणि त्यांचं शक्तिप्रदर्शन पार पडणार आहे.

एकत्र जमण्यामागचं कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 162 आमदारांचं आज फोटोशूट करण्यात येणार आहे. भाजपने अजित पवार यांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केलाच पण त्याहीसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेण्यात आली. हे सर्व बघून आमदारांचं मनोबल खचू नये, त्यांच्यात सत्ता स्थापनेची ऊर्जा पुन्हा निर्माण व्हावी म्हणून हे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.

Maharashtra Government Formation Live News Updates: शरद पवार Grand Hyatt च्या दिशेने रवाना

शक्तिप्रदर्शनाने काय होऊ शकते?

या शक्तिप्रदर्शनाने सत्ता जरी स्थापन करता येऊ शकणार नसली तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यपालांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही एकत्र आहोत. तसेच भाजपला देखील त्यांच्याकडे असलेला आकडा दाखवून द्यायचा हा एक प्रयत्न आहे.