Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago
Live

Maharashtra Government Formation Live News Updates: '145 आमदार तरी तिथे उपस्थित होते का?' आशिष शेलार यांचा 'महाविकासआघाडी' ला सवाल

महाराष्ट्र Dipali Nevarekar | Nov 25, 2019 08:32 PM IST
A+
A-
25 Nov, 20:32 (IST)

तिन्ही पक्षांनी केलेली ओळख परेड म्हणजे पोरखेळ असं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं. तसेच आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाची शपथ घेतली असल्याने मराठी माणसाची मान आज शरमेने खाली गेली, अशी टीका शिवसेनेवर त्यांनी केली. फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण 145 आमदार तरी तिथे उपस्थित होते का? असा सवाल देखील त्यांनी महाविकासआघाडीला विचारला आहे. 

25 Nov, 20:05 (IST)

"ज्या व्यक्तीला पक्षाने पदावरून दूर केले आहे, त्या व्यक्तीला पक्षाबाबत कोणताही निर्णय घेण्यास अधिकार नाही," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. 

25 Nov, 19:56 (IST)

मी पुन्हा आलो, असे म्हणणार नाही; पण आम्ही आलो आहोत असे म्हणेन, आमचा रस्ता मोकळा करा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारला लगावला टोला.

25 Nov, 19:46 (IST)

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'महाविकासआघाडी' आघाडीच्या बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे. अशोक चव्हाण यांनी भाषणाला सुरुवात करून सर्व आमदारांचे मनोबल वाढवले. नंतर 'महाविकासआघाडी' कडे 162 चं नाही तर त्याहून अधिक आमदारांच्या आकडा असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. 

25 Nov, 19:21 (IST)

'महाविकासआघाडी' च्या शक्तिप्रदर्शनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 162 आमदार एकत्र उपस्थित राहतील. त्याचसोबत उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, शरद पवार, आदित्य ठाकरे यासोबत अनेक बडे नेते या शक्तिप्रदर्शनाला उपस्थित आहेत. 

25 Nov, 18:03 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ग्रँड हयातकडे रवाना झाले आहेत. पक्षाचे आमदार देखील ग्रँड हयातच्या दिशेने निघाले आहेत. महाविकासआघाडी करणार का 162 चा आकडा आज सिद्ध? 

25 Nov, 17:27 (IST)

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाआघाडीचे 162 आमदार हॉटेल ग्रँड हयातमध्ये आज सायंकाळी एकत्र येणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केला.

25 Nov, 16:20 (IST)

राज्यपाल घटनेच्या चौकटीत  राहून काम करत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते वारंवार पंचातारांकित हॉटेलमध्ये राहत आहेत, वारंवार हॉटेल बदलत आहेत याची गरज काय? असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आमदारांना हॉटेलमध्ये डांंबून ठेवल्याचा आरोप लावला आहे. 

25 Nov, 16:13 (IST)

राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केलेली नाही तसेच घटनात्मक चौकटीत राहून काम केल्याचं  रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या सहीचे पत्र दिले. त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यामुळे त्यांचा व्हीप आमदारांना लागू असेल. असे  भाजपाकडून आज सांगण्यात आलं आहे.  

25 Nov, 15:06 (IST)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे   बंडखोर नेते अजित पवार 'उपमुख्यमंत्री' पदाचा भार न स्वीकारताच घरी परतले आहे. विधानसभेतील दालनात त्यांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत सुमारे 4 तास चर्चा झाली  

Load More

Maharashtra Government Formation Highlights: महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष शिगेला असताना आज महाराष्ट्राचे सारे लक्ष सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शनिवार (23 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 8च्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथसोहळा पार पडला. आता 30 नोव्हेंबर पूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र त्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आज (25 नोव्हेंबर) दिवशी विधानसभेत तातडीने विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. 10.30 वाजता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर सत्तावाटपाची चर्चा? किती महामंडळं, मंत्रिपद मिळणार?

तातडीच्या सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर काल झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती एन. व्ही. रामणा, न्यायमूर्ती अशोक भूषण व न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. काँग्रेस नेते कपिल सिब्बल, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे अभिषेक मनु सिंघवी तर, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. काल न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नोटीस बजावून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आता राज्यात निवडून आलेल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रवादीचे माजी विधिमंडळ गटनेता अजित पवार यांनी 54 आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे सादर करून भाजप सोबत सरकार स्थापन केल्याची शंका शरद पवार यांनी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही फसवणूक असल्याची चर्चा आहे. दरम्यान अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेला शरद पवार यांचा एनसीपी पक्ष अध्यक्ष म्हणून पाठिंबा नसल्याने अजित पवार कशाच्या जोरावर हा दावा करत आहेत? हे पाहणं देखील आता मोठं उत्सुकतेचं ठरलेलं आहे.तसेच विश्वासदरशक ठराव कसा पार पडणार याबाबतही कमलीची उत्सुकता आहे.


Show Full Article Share Now