नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलीवूडमध्ये 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने घवघवीत यश संपादन केले आहे. अजय देवगण अभिनित हा चित्रपट, तान्हाजी मालुसरे या मराठा साम्राज्यातील शूरवीरावर आधारित आहे. चित्रपटाने नुसते प्रेक्षकांनाच भुरळ पडली नसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील या चित्रपटाच्या भलत्याच प्रेमात पडलेले दिसत आहेत. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी हा हॅशटॅग वापरात पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
या हॅशटॅगचा वापर करत, छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर मावळा तानाजी मालुसरे जसा होता त्याचप्रमाणे आपणही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मावळे आहोत, असा निर्धार मनसेच्या कार्यकर्त्यांचा सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे.
औरंगजेबाच्या ताब्यातील कोंढाणा पुन्हा जिंकण्यासाठी स्वराज्याचे- शिवरायांचे शिलेदार तान्हाजींनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली...
आपण आपलाच पक्ष वाढवून आपली #विधानसभा #प्रभाग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नाही करू शकत?
फक्त जिंकण्याचा निर्धार करूया!#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी
— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) January 12, 2020
🚩साहेब आज मी शपथ घेतो की, पक्षाच्या चांगल्या वाईट काळात सदैव पक्षासाठी झटणार , प्रभाग असो किंवा वार्ड मी तुमचा गड राखणारच... 🚩 #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी #मराठी pic.twitter.com/EChK7l72C8
— Sandesh Nevrekar (@Sandesh_Nevrekr) January 13, 2020
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या 23 जानेवारी रोजी मनसेचे महाअधिवेशन आहे. या अधिवेशनात मनसेच्या नव्या झेंड्याचा अनावरण केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचसोबत, या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाबाबत भूमिका घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या सर्व निर्णयांना कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे असे या हॅशटॅग ट्रेंड वरून दिसून येत आहे.
🚩साहेब आज मी शपथ घेतो की, पक्षाच्या चांगल्या वाईट काळात सदैव पक्षासाठी झटणार , प्रभाग असो किंवा वार्ड मी तुमचा गड राखणारच... 🚩 #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी #मराठी @RajThackeray pic.twitter.com/c1tLHfS9S5
— Raj_samarthak_ulhas_desle (@desle_raj) January 12, 2020
मला दुचाकीची सवय नाही; मात्र, 3 चाकी सरकार चालवतो आहे– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तान्हाजी या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, फक्त तीन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटात, अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसत आहे, तर काजोल ही तान्हाजी यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका साकारत आहे. सैफ अली खान उदयभानच्या रोलमध्ये दिसत आहे.