शिवसेना पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण देण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी राजभवनावर बोलावलं होतं. परंतु शिवसेनेला 24 तसंच अवधी देऊनही ते सत्ता स्थापन करू शकले नाहीत. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या इतर बड्या नेत्यांनी राज्यपालांची काल भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु, पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेनेने राज्यपालांकडे आणखी काही अवधी मागितला होतं. राज्यपालांनी तो नाकारला आणि सत्ता स्थापनेची पुढील संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली.
या सर्व घडलेल्या प्रकारावर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला परंतु उद्धव ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले होते. पण आज अखेर टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "अविश्वसनीय करून दाखवणार," असं म्हणत त्यांनी अजूनही सत्ता स्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, "राज्यपालांनी वेळ कमी दिला त्यांची खंत," असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांना अचानक छातीत दुखायला लागल्याने त्यांना काल लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज रुग्णालयात गेले असताना ही प्रतिकिया त्यांनी व्यक्त केली आहे.