प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Mumbai Monsoon 2019 High Tide: मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर सर्वात मोठी चिंता असते ती समुद्राला येणा-या भरतीची. जवळपास महिनाभर दडी मारलेल्या पावसाने आज मुंबईसह संपूर्ण ठाण्यात दमदार हजेरी लावलीय. त्यामुळे बीएमसीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तातडीची उपाययोजना सुरु केली आहे. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर महिन्यातील भरतीच वेळापत्रकही BMC कडून जाहीर करण्यात आले आहे.

या यादीप्रमाणे जुलै महिन्यात 5 तारखेला, ऑगस्ट मध्ये 3 तारखेला आणि सप्टेंबरमध्ये 1 तारखेला मोठी भरती येणार असल्याचे सांगण्यात येतय.

यात 5 जुलैला दुपारी 2.06 मिनिटांनी, 3 }ऑगस्ट ला 1.44 मिनिटांनी आणि 1 सप्टेंबरला 1.15 मिनिटांनी सर्वात मोठी भरती येणार असल्याचे दिसतय.

हेही वाचा- High Tide In Mumbai: जून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता

त्यामुळे High Tide च्या दृष्टीने बीएमसीने खबरदारीचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाईल, या दृष्टीने मुंबई महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.