Maharashtra Monsoon Forecast: मुंबई, ठाणे, पालघर सह कोकण किनारपट्टीवर आज मुसळधार पावसाची शक्यता- IMD
Monsoon 2020 (Photo Credits: PTI)

मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर गेले काही दिवस हलक्या स्वरुपात बरसणारा पावसाचा जोर आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) येथे मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीचा अंदाज आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीवरील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथेही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे.

आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तर बुधवारी सकाळपासूनच मुंबईत पावसाच्या सरी बरसत होत्या. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, सांताक्रुझ वेधशाळेने मुंबईत काल 5.6mm पावसाची नोंद झाली. कुलाबा वेधशाळेने 2.2 mm पावसाची नोंद केली आहे. दरम्यान 11 ऑगस्ट पासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असा हवामान खात्याचा अंदाज होता.

ANI Tweet:

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने तुळशी, विहार ही तलावं ओव्हरफ्लो झाली. तसंच तलावातील पाणीसाठा 60.17% इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. दरम्यान, पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम राहणार असून ऑगस्ट अखरेपर्यंत राज्यात समाधानकारक पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.