कोल्हापुरात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय; प्रशासनाकडून रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा
kolhapur Flood (Photo Credits: Twitter)

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर (Kolhapur) शहरात पूर परिस्थिती (Flood) निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक संकटाला सामोरे जावा लागले होते. तसेच काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोल्हापूरकरांनी या परस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले नसाताना, आणखी एक संकट त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आहे. पंधरा दिवसानंतर कोल्हापूरात पुन्हा जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. यामुळे प्रशासनाने कोल्हापूरकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कोल्हापूरमध्ये काही दिवसापूर्वीच पूर आल्यामुळे येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर राज्यातून काही लोक पूरग्रस्थांसाठी मदतीचा देत आहेत. पूरग्रस्थांसाठी अन्न, वस्त्र यांसारख्या इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. कोल्हापूरकरांची ही जखम भरली नसून यात पुन्हा प्रशासनाने कोल्हापूरकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरातील भोगावती नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. तसेच 32 बंधारे पाण्याखाली गेलेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील राधानगरी (Radha Nagari) , कुंभी (Kumbhi), कासारी (Kasari), तुळशी (Tulshi), वारणा (Vaarna) आणि दूधगंगा (Dudhganga) धरण परिसरात पावसाने अधिक जोर धरला आहे. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Mumbai Rain Update: मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज; सप्टेंबर 5 रोजी शाळा, जुनिअर कॉलेजला सुट्टी जाहीर

धरणातून केलेला क्युसेक विसर्ग

कुंभी 1800

कासारी 1800

तुळशी 1110

वारणा 8305

दूधभंगा 8800

गगणबावडा या ठिकाणी बुधवारी भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील सखल भागात आणि रस्त्यावर पाणी साचले होते. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.