Maharashtra Heatwave: राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पावसासोबत येणार उष्णतेची लाट, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन
Photo Credit - Twitter

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. तर काही राज्यांमध्ये कडाक्याच्या ऊन्हामुळे नागरिक हैराण झाले आहे. राज्यात यामुळे सध्या ऊन आणि पावसाळ्याचा खेळ सुरु असल्याने नागरिक हैराण झाले आहे. राज्यात हवामान खात्याने (Weather Deaprtment) राज्यात पुढचे 4 दिवस काही जिल्ह्यात अवाकळी पाऊस तर काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यात गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन हवामान खात्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

एकीकडे सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तर दुसरीकडे तापमान वाढल्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. या ऊन-पावासाच्या खेळामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला, आंबा, संत्रे, कांदा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल आहे. हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.