Kopar Khairane Crime: वाढदिवशी लॉजवर नेलं अन् प्रेयसीची केली निर्घृण हत्या, आरोपीला अटक, कोपर खैरणे येथील घटना
Murder PC Pixabay

Kopar Khairane Crime: कोपर खैरणे एमआयडीसीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबई येथील आश्वी लॉजमध्ये आरोपीने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर नवी मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी शोएब शेख आणि त्याची प्रेयसी अॅमी उर्फ अमित सिंग हे दोघे ही लॉजवर गेले होते त्यावेळी ही घटना घडली. आरोपी हा साकीनाका परिसरातील रहिवासी आहे. तो माटुंगा येथील गॅरेजमध्ये काम करायचा. (हेही वाचा- 6 महिन्यांच्या मुलीला मिठीत घेऊन आईची 16व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; )

मिळालेल्या माहितीनुसार, अमित कौर ही जुईनगर येथील खासगी बॅंकेत मॅनेजर पदावर नोकरीला होती. शोएब हा २४ वर्षाचा असून त्याची प्रेयसी अमित कौर त्याच्यापेक्षा अकरा वर्षांनी मोठी होती. तीन महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. अमित कौरचे घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे, शोएबला अमित कौर हिचे दुसरे अफेएर असल्याचा संशय आल्याने अमितला संपवून टाकण्याचे प्लॅन शोएबने बनवला. अमित कौर हिच्या वाढदिवशाच्या निमित्त दोघे ही लॉजवर गेले. त्यावेळी पार्टी संपली आणि तिचा खून केला.

हत्येनंतर शोएब त्याच्या घरी आला त्यानंतर एकाने काही दिवशांनी एकाने त्याच्यावर खुनाचा संशय घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती देताच, पोलिस शोएबच्या घरी पोहचली आणि त्याला अटक करून पोलिस ठाण्यात घेऊन गेली. त्यानंतर पोलिसांनी शोएबची कंबर कसून चौकशी केली. चौकशीत त्याने अमित कौरची हत्या केल्याचे कबुल केले. तीचा मृतदेह लॉजच्या रुममध्ये अमितचा मृतदेह सापडला. शोएब विरुध्दात गुन्हा दाखल करत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.