काँग्रेस खासदार राहुल गांधी Hathras येथे पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघाल्यानंतर झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकारामुळे राज्यातील नेते मंडळींकडून निषेध व्यक्त; पहा ट्विट्स
राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवले (Photo Credits-ANI)

Hathras Gang Rape: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वाड्रा हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बालात्कार प्रकरणातील पीडितेच्या परिवाराची भेट घेण्यासाठी निघाले होते. मात्र या दोघांना यमुना एक्सप्रेस वे येथे अडवण्यात आले. त्यानंतर प्रियंका आणि राहुल यांनी तेथ पर्यंत पोहचण्यासाठी पायी चालण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आले. याच कारणास्तव आता राज्यातील विविध नेते मंडळींकडून आणि काँग्रेस पक्षाकडून या प्रकाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या निषेधार्थ नेते मंडळींनी आपल्या प्रतिक्रिया ट्विट करत व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रति जे उत्तर प्रदेशातील पोलिसांनी जे केले अत्यंत दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने लोकशाही मधील मुल्ये पायदळी तुडविण्याचा निंदनीय आहे.(Anil Deshmukh on Hathras Gangrape: इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या राज्यातील 'जंगल राज' विरुद्ध कारवाई करा; गृहमंत्री अनिल देशमुख यांची UP CM योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका)

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट मध्ये असे म्हटले की, उत्तर प्रदेशातील सरकार हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना जाऊ देत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबद्दल उत्तर प्रदेशातील सरकारने विचार करावा.

कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट मध्ये असे म्हटले आहे की, अत्याचार पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरस येथे निघालेले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना रोखणे, राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दंडेलशाहीचा अशोक चव्हाण यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.(Hathras Gangrape: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिताच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत जाहीर)

खासदार सुप्रीया सुळे यांनी ही युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते असे म्हटले आहे. पोलिसांनी न्याय मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणे किती योग्य आहे याचा न्याय सुप्रीया सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हाथरस येथे निघाले असता त्यांना वाटेवरच अडवण्यात आले. त्यानंतर पायी चालण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही त्यांना रोकले गेले. लाठीचार्ज ही करण्यात आला. काही कार्यकर्ते सुद्धा जखमी झाले. पण आमचा हेतू निश्चित आहे. एक अहंकारी सरकारची लाठीचार्ज आम्हाला रोखू शकत नाही. जर हेच लाठीचार्ज पोलिसांकडून दलित मुलीच्या रक्षणासाठी उभी असायला हवी होती असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.