Happy New Year 2019: नववर्षाच्या पूर्वसंधेला पश्चिम रेल्वेकडून चार स्पेशल ट्रेन्सची सुविधा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

Special Trains On New Year Eve : नव वर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने (Western Railway) स्पेशल लोकल ट्रेन्सची सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला मध्यरात्रीपर्यंत रेल्वे लोकल्स धावतील. विरार ते चर्चगेट (Virar to Churchgate) आणि चर्चगेट ते विरार (Churchgate to Virar) या दरम्यान चार स्पेशल लोकल्स धावणार आहेत. या चारही लोकल्स 12 डब्यांच्या असून त्या विरार ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे प्रवक्ते रविंद्र भास्कर यांनी दिली.

माहितीनुसार, चर्चगेटहून विरारला जाणारी शेवटची लोकल 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 3:25 मिनिटांनी सुटेल. तर विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची लोकल 3:05 मिनिटांनी सुटेल. स्पेशल ट्रेन्स चर्चगेटवरुन रात्री 1.15, 2, 2.30 आणि 3.25 इतक्या वाजता सुटतील. तर विरारहून रात्री 12.15, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता स्पेशल ट्रेन्स सुटतील.

सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच स्पेशल ट्रेन्सची सोय केली जाते. यापूर्वी गणेशोत्सवात आणि ख्रिसमसला देखील स्पेशल ट्रेन्सची सुविधा सुरु करण्यात आली होती.

ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकण रेल्वेने हिवाळी स्पेशल ट्रेन्सची सुविधा सुरु केली आहे. या स्पेशल ट्रेन्समध्ये करमाळी सुपरफास्टचा समावेश आहे. पश्चिम रेल्वे: महिला प्रवाशांना ख्रिसमस गिफ्ट, दोन नव्या ‘लेडीज स्पेशल' लोकल-ट्रेन सेवेत दाखल

02001 / 02002 लोकमान्य टिळक करमाळी सुपरफास्ट- ही स्पेशल ट्रेन मुंबईहून रात्री 12.45 वाजता ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या दिवशी सुटेल आणि करमाळीला दुपारी 1.30 पोहचेल.

त्याचदिवशी करमाळीहून परत येण्यासाठी ट्रेन दुपारी 2 वाजता सुटेल आणि रात्री 11.45 ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सला पोहचेल. ही ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकांत थांबेल.