
मुंबईतील (Mumbai) सर्वात मोठे आणि कामासाठी बहुतांश लोकांची वर्दळ दिसून येणारे, सीएसएमटी(CSMT) स्थानक हे ऐतिहासिक काळातील महत्वाचे रेल्वेस्टेशन असल्याचे मानले जाते. तसेच आज (20 जून) सीएसएमटी स्थानकाला 132 वर्ष पुर्ण झाली असली तरीही त्याचे सौंदर्य पूर्वीसारखेच खुलून दिसते.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्थानक मुंबईतील सर्वात मोठे रेल्वेस्थानक असून त्याची उभारणी आणि त्याच्यावरील नक्षीकाम हे पाहण्याजोगे आहे. त्याचसोबत युनेस्कोचे जागतिक वारसा लाभलेले असे हे रेल्वेस्थानक आहे. सीएसएमटीच्या परिसरात अनेक पर्यटक सुद्धा तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जगभरातून येत असतात.(लातूर येथे तयार झाले देशातील पहिले Grass Painting; 7 दिवस गवत उगवून साकारले शिवाजी महाराज (Video)




मार्च 1996 पर्यंत सीएसएमटी स्थानक व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यानंतर त्याचे नामकरण करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ओळखले जाऊ लागले.