मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर अजाण वेळी हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याचे अवाहन कार्यकर्त्यांना केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सतर्क झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी राज्यातील विविध ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करुन त्यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पदाधीकाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मुस्लिम नागरिकांनीही हळू आवाजात आजाण पटण केली. तर काही ठिकाणी लाऊडस्पीकरही वापरण्यात आले नसल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आजान वेळी हनुमान चालीसा लावल्या.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, काही ठिकाणी मुस्लीम बांधवांनी संजसपणा दाखवला आहे. त्यांच्या भूमिकेचे कौतुक आहे. ज्या ठिकाणी मोठ्या आवाजात आजाण झाली नाही. त्या ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही देशपांडे यांनी म्हटले. (हेही वाचा, Loudspeaker Row in Maharashtra: Raj Thackeray यांनी शेअर केला 'मशीदीवरील भोंगे उतरवलेच पाहिजे' या आवाहनाचा बाळासाहेब ठाकरेंचा जाहीर सभेतील जुना व्हिडिओ (View Tweet))
काही ठिकाणी लाऊडस्पीकर न लावता अजाण पठण झाल्याचेही आढळून आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात आज पाहाटे हळू आवाजात आजान झाल्याचे समजते. ज्या ठिकाणी मोठ्या आवाजात आजाण झाली नाही त्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनीही हनुमान चालीसा लावल्या नाहीत. दरम्यान, पोलिसांनीही कोणताही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी कठोर मेहनत घेतल्याचे दिसूनआले. नियमांची कठोर अंमलबजावणीही केली.
दरम्यान, औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा झाल्याने संभाव्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इथल्या 48 मशिदींबाहेर कडेकोठ बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी राबवलेल्या कडक धोरणांमुळे अद्याप पर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अनुचीत घटना घडल्याचे वृत्त नाही.