Gram Panchayat Election 2021: मनमाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत गोंधळ; EVM मशीनमधून उमेदवाराचे नाव गायब
प्रतिकात्मक फोटो (FILE PHOTO)

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान प्रक्रीया सुरु असताना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनामाडमधून (Manmad) एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Panewadi Gram Panchayat Election) आज (15 जानेवारी) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम मशीनमधून एका उमेदवाराचे नावच गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला आहे. (Maharashtra Gram Panchayat Election 2021: आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार येथे 30-35 वर्षांत पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक; पोपटराव पवार रिंगणात)

निवडणूकांदरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये होणारे घोळ काही नवे नाहीत. यापूर्वी देखील विविध निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशिनचे घोळ, बिघाड समोर आले आहेत.दरम्यान, पानेवाडी येथील वॉर्ड नंबर 2 म धील उमेदवाराचे नाव ईव्हीएम मशीनवर नाही. हे निर्देशनास येताच वॉर्ड 2 मधील मतदान प्रक्रीया थांबवली. दरम्यान, घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे. त्याचबरोबर कोल्हापूर मध्ये देखील ईव्हीएम मशिन बंद पडली. मशीनच्या चाचणी दरम्यान सिग्नल न आल्याने मशिनमधील बिघाड निर्दशनास आला. (Gram Panchayat Election 2021: रायगड मध्ये ग्रामपंचायतीवर फडकला भगवा झेंडा, शिवसेनेच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड)

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. सोमवार, 18 जानेवारी रोजी या निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. तसंच महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. दरम्यान, चोख व्यवस्था आणि काटेकोर बंदोबस्तात मतदान प्रक्रीया पार पडत आहेत. काही मतदान केंद्रांवर वृद्ध लोकांना उचलून मतदानासाठी नेण्यात येत आहे.