Anna Hazare, Popatrao Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यभरात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा (Maharashtra Gram Panchayat Election 2021) धुरळा उडाला आहे. अनेक गावे निवडणूक बिनविरोध करु पाहात आहेत. तर काही गावांमध्ये 30-35 वर्षांचा इतिहास मोडत पहिल्यांदाच निवडणुका पार पडत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांचे राळेगणसिद्धी ( Gram Panchayat Ralegan Siddhi) आणि पोपट पवार (, Popatrao Pawar) यांचे हिवरे बाजार ( Gram Panchayat Hiware Bazar) ही दोन्ही गावेही यापैकीच एक. दोन्ही गावांमध्ये अनुक्रमे 30 आणि 35 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक झाली नाही. आजवर ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. परंतू, नव्या पिढिला गावात निवडणूक हवी आहे. त्यांमुळे या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लागली आहे.

हिवरे बाजार गामपंचायीत नेहमी बिनविरोध सरपंच होणारे पोपटराव पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर हवीच आहे तर गावात निवडणूक घ्या पण ती शांततेत पार पाडा असा पालकत्वाचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिल्याचे समजते. गावातील तरुणालीआल जर निवडणूक हवी आहे तर ती घ्यायला हवी. त्याशिवाय लोकशाही प्रक्रिया आम्हाला कशी समजणार? असे म्हणत अण्णा हजारे यांनी गावकऱ्यांना निवडणुकीस समंती दिल्याचे सांगितले जात आहे.

हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूक एकूण 7 जागांसाठी पार पडत आहे. या गावात एकूण 7 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यातूनच एकाची सरपंच म्हणून निवड केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आजवर बिनविरोध निवडूण येणारे पोपटराव पवार हेसुद्धा या निवडणुकीत रिंगणात आहेत. पवार यांच्या विरोधात एक शिक्षक निवडणूक लढवत आहेत. किशोर संबळे असे या शिक्षक महोदयांचे नाव आहे. ते एका खासगी शिक्षणसंस्थेमध्ये नोकरी करतात. यासोबतच इतर वॉर्डांमध्येही एकास एक या प्रमाणात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने गावातील परंपरागत विरोधक विरुद्ध पोपटराव पवार असा सामना रंगताना दिसतो आहे. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Election 2020: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 30 ग्रामपंचायती बिनविरोध; आमरादर निलेश लंके यांची आयडिया प्रभावी)

पोपटराव पवार यांच्या विरोधात असलेल्या पॅनलमधील उमेदवारांनी पोलीस अधिक्षकांडे पोलीस संरक्षण मागितले आहे. आमच्या विरोधकांपासून आमच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण द्यावे असे या मंडळींचे म्हणने आहे. दुसऱ्या बाजूला, गावासाठी विकासकामे करताना काही लोकांचे समाधान झाले नसेल. त्यामुळे काही लोकांची नाराजी असू शकते. त्यामुळे नेहमीप्रमाणे निवडणूक बिनविरोध पार पडू शकली नाही. असे होऊ शकते. मात्र, ही निवडणूक शिस्त विरुद्ध बेशिस्त अशी आहे अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, एका बाजूला आदर्श गावे ठरलेल्या गावांमध्ये निवडणुका लागल्या आहेत. दुसऱ्या बाजूला पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी निवडणुका बिनविरोध करण्याचे अवाहन केले आहे. जी गावे ग्रामपंचायत बिनविरोध करतील त्यांना आमदार निधीतून 25 लाख रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणाही आमदार लंके यांनी केली आहे. आमदार लंके यांच्या घोषणेला राळेगणसिद्धी गावाने पहिल्या प्रतिदास दिला. अण्णा हजारे यांनीही या योजनेचा आपण प्रसार करणार असल्याचे म्हटले खरे. परंतू, आता राळेगणसिद्धीतच निवडणूक लागली आहे.