शनिवारी राजभवनातील (Rajbhavan) 18 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID 19 Positive) आल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी स्वतःला विलगीकरणात (Qurantine) ठेवल्याचे वृत्त काही वेळापूर्वी आम्ही दिले होते. मात्र यावर आता राज्यपालांनी स्वतः प्रतिक्रिया देत आपली तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले, तसेच आपण क्वारंटाईन मध्ये नाही आहोत मात्र तरीही आवश्यक त्या सर्व खबरदारी राजभवनात बाळगली जात आहे असेही कोश्यारी यांनी म्हंटले आहे. कोरोनासाठी आवश्यक सर्व टेस्ट करण्यात आल्या असून त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याचे सुद्धा कोश्यारी यांनी म्हंटले. कोरोनाची लक्षणे देखील कोश्यारी यांच्यात दिसून आली नाहीत. मुंबई: ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण; सुदैवाने जया बच्चन COVID 19 निगेटिव्ह
राजभवनात कोरोनाची लागण झालेले 5 ते 6 वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी हे कोश्यारी यांच्या नेहमीच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले होते. अशावेळी खबरदारी म्हणून सध्या राजभवनातील अन्य लोकांना तपासण्यासाठी इन-हाऊस डॉक्टर आणि पॅरामेडिक्सची एक टीम नियुक्त केली आहे. बाहेरील कोणत्याही व्यक्तीस पुढील काही काळासाठी राजभवन परिसरात प्रवेश नसेल तसेच काही दिवस कोणत्याही बैठका घेतल्या जाणार नाहीत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ट्विट
आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 12, 2020
दरम्यान, राजभवन परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. राजभवनात स्टाफ क्वार्टर हे मुख्य कार्यालय आणि राज्यपालांच्या निवासस्थानापासून वेगळे आहेत.ज्या इमारतींमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्या इमारतींना कंटेनमेंट झोन जाहीर केले जाईल ”असे बीएमसी तर्फे सांगण्यात आले आहे.