पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; दिवसभरात 1088 रुग्णांची भर, 39 मृत्यू; 12 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Dipali Nevarekar
|
Jul 12, 2020 11:44 PM IST
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काल (11जुलै) त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. यामध्ये ताप आणि खोकला आहे. काल बच्चन कुटुंबामध्ये जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची देखील स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून आज त्यांचा रिपोर्ट येईल. अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवरून माहिती देताना मागिल 10 दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तर अभिषेक बच्चन कडून देखील चाहत्यांना पॅनिक न होण्याचं आवाहन केलं आहे.
काल महाराष्ट्रात 24 तासांत सर्वाधिक 8139 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 4360 जणांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला असून 223 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढून आता 2,46,600 वर पोहचला आहे. तर मुंबईमध्ये 1308 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिवसभरात 39 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1,497 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव वाढत आहे तेथे मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद यांचा समावेश आहे.