Gopinath Munde | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपचे (BJP) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज पुण्यतिथी. 12 डिसेंबर 1949 मध्ये जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून 2014 या दिवसी दिल्ली येथे अपघाती निधन झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी (Gopinath Munde Death Anniversary) निमित्त त्यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) समाजमाध्यमातून संवाद साधणार आहेत. याची माहिती देताान पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी आपण आज दुपारी 2.10 वाजता संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.

पंकजा मुंडे ट्विट

"अनेक प्रण-अनेक व्रत,तुमच्या समवेत बोलायचे,ऊर्जा प्रेरणा आणि आशा घ्यायची आणि आपला प्रवास आखण्याचा 3Juneचा दिवस आज खूप बोलायचे आहे पण facebook liveमधून कारण तुमचे आरोग्य !गोपीनाथ गडावर आज न येता दुपारी 1 ते 2 पोस्ट पाकीट विमोचन पहा व 2:10 वाजता मी बोलणार मायबाप जनते सोबत ऐकणार ना?" (हेही वाचा, Gopinath Munde Jayanti 2019: 'संघर्षयात्री' गोपीनाथ मुंडे व्यक्तिगत जीवन आणि राजकीय प्रवास)

पंकजा मुंडे ट्विट

पंकजा मुंडे यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "तुमच्या नसण्याची उणीव तरीही तुमच्या असण्याची जाणीव कशी एकाच वेळा जाणवते."

गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते होते. 1980 पासून ते भारतीय जनता पक्षात काम करत होते. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिले होते. केंद्रामध्येही त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कारभार होता. भाजपसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्ष महाराष्ट्रभर वाढवला. त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून आज भाजप इतका विस्तारल्याचे पाहायला मिळते. तसेच, विधानसभा 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, त्यांच्या अकाली निधनामुळे अनेकांना धक्का बसला. त्यांच्याबाबतची अनेकांची मतं, आपेक्षा, स्वप्नं प्रत्यक्षात उतरु शकली नाहीत.