Gopichand Padalkar Booked For Atrocity: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांच्यावर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Gopichand Padalkar | (Photo Credits: Facebook)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात (Atpadi Police Station) फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. महादेव वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आटपाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. वाघमारे यांनी गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे ब्रम्हानंद पडळकर यांच्यावरही हा गुन्हा दाखल झाला आहे. महादेव वाघमारे हे आटपाडी (Atpadi ) तालुक्यातील झरे (Zare) येथील रहिवासी आहेत.

महादेव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गोपीचंत पडळकर आणि त्यांच्या बंधुंसोबत 2011 मध्ये जमीन व्यवहार झाला होता.. या व्यवहारावरच वाघमारे यांना आक्षेप आहे. पडळकर बंधुंनी खोटी कागदपत्रे जमा करुन वाघमारे यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात IPC 420 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (हेही वाचा, MSRTC Employee Strike: मुंबई मधील आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची माघार; पुढील आंदोलनाचा निर्णय कर्मचार्‍यांवर सोडल्याची घोषणा)

गोपीचंद पडळकर हे नेहमीच चर्चेत असतात. महाविकासआघाडी आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या विविध वक्तव्यांमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकताच त्यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा नुकताच दाखल झाला होता. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी एका व्हिडिओ द्वारे आरोप केला होता की, महाविकासआघाडी विरोधात वारंवार टीका केल्याने आपल्याला गुन्ह्यात अडकविण्याचा कट केला जातो आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही पडळकर यांनी केला होता.