नागपूर (Nagpur) येथील विमानतळावर शरीरातून सोन्याची पेस्ट तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सीमा शुल्क विभागाकडून या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
शरीरातून जवळजवळ 25 लाख रुपये किंमत असलेल्या सोन्याच्या पेस्टची दोन व्यक्ती तस्करी करत होते. त्यावेळी सीमा शुल्क विभागाला या दोघांच्या हालचालींवरु संयश आल्याने त्यांची अधिक तपासणी केली गेली. त्याचसोबत दोघांचे एक्सरे सुद्धा काढले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(मुंबई: Nude फोटोवरुन सहकाऱ्यांचे ब्लॅकमेलिंग; 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या)
या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचसोबत या दोघांना मदत करणाऱ्या व्यक्तिंबद्दल अधिक तपास घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.