
Gold Rate in MaharashtraToday: भारतात आजचा सोन्याचा दर: 16 ऑगस्ट रोजी, भारतात 10 ग्रॅम पिवळ्या धातूसाठी सोन्याची किरकोळ किंमत अनेक शहरांमध्ये अंदाजे 60,000 रुपये आहे. विशेषत: 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,510 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,550 रुपये आहे. याउलट, चांदीची किंमत 75,000 रुपये प्रति किलो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने दरावर नजर टाकता तो पुढीलप्रमाणे मुंबईमध्ये प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,550 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,510 रुपये आहे. पुणे शहरात प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,316 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 60,340 रुपये आहे. नागपूर मध्येही अनुक्रमे 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत पुण्यामुंबई येवढीच आहे. तर नाशिक शहरात मात्र प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,480 रुपये तर 24 कॅरेट सोनेच्या किंमत 59,430 रुपये इतकी आहे. (हेही वाचा - Tomato Price: टोमॅटोच्या किंमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा)
सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.