Gold Rate, Silver Price Today: आजचा सोने चांदी दर, प्रति तोळा किती? घ्या जाणून
Jewellery (Photo Credits: Pixabay)

सोने चांदी दरात (Gold-Silver Price) नेहमीच बदल होत राहतात. आजही (17 ऑगस्ट) या दरात काहीसे बदल पाहयला मिळत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोने (Gold) मंगळवारी 0.03% दराने काहीशा नरमाईने व्यवहार करत असल्याचे दिसते. सोन्याच्या तुलनेत चांदी (Silver ) मात्र वधारताना दिसत आहे. सप्टेंबर फ्युचर्स चांदी 0.24 % उच्चांकासह चढती कामगिरी करताना दिसते आहे. पाठमागिल सत्रात सोने व्यापारात (Gold Rate, Silver Price Today) अस्थिरता पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोने 0.4% इतके तर चांदी 0.54% नी वाढल्याचे पाहायला मिळाले.

पाठिमागील आठवड्यात प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम सोने 45,600 रुपये इतके खाली आले होते. आता सोने काहीसे वधारताना दिसत आहे. त्यानुसार सोन्याचा विद्यमान दर प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 47,000 रुपयांच्याही वर गेल्याचे पाहायला मिळते. पाठिमागील वर्षी सोने उच्चांकी दराने विक्री झाले. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांनीही विकले गेले. (हेही वाचा Today Petrol And Diesel Price: देशात आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर, जाणुन घ्या तुमच्या शहरातील दर )

आजचे दर

एमसीएक्सवरील ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याचे दर 13 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोने प्रति 10 ग्रॅम 47,212 रुपये दराने विकले जात आहे. MCX वर सप्टेंबर चांदी वायदा किंमत वाढली आहे. 153 रुपयांच्या वाढीसह चांदी प्रति किलो 63,610 रुपये इतही विक्री होताना दिसत आहे.

दरम्यान, सराफा बाजारात काल (सोमवार, 16 ऑगस्ट) सोने-चांदी दरात काहीशी घट पाहायला मिळाली. सोने दरा 42 रुपयांची घट पाहायला मिळाली. त्यानुसार सोने प्रति 10 ग्रॅम 45,960 रुपये दराने विक्री (बंद) झाले. आजही चांदी दी 61,469 रुपये प्रति किलोवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले.