राज्यातील विधानसभा निवडणूक (Maharashtra assembly elections 2019) प्रक्रिया खुल्या, आणि निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह गोव्यातील काही ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘ड्राय डे’ (Dry Day) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, मतदानाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला आणि मतमोजणीच्या दिवशी २४ ऑक्टोबरला ‘ड्राय डे’ असणार आहे. कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तशा (State Excise Department) सुचना दिल्या आहेत.
डिजीआयपीआर ट्विट -
#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री करण्यास मनाई. #DryDay जाहीर - राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती
वाचा | https://t.co/bLrNzaVlVS pic.twitter.com/pZ4CGxCcYK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 29, 2019
हेही वाचा - मद्यपींसाठी खुशखबर! सरकार राज्यात 'Dry Day' ची संख्या घटवणार
यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीवरील काही ग्रामपंचायतीचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुक्क विभागाने सांगितल्यानुसार, मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे मद्यविक्री करणाऱ्या परवानाधारकांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या कालावधीत सर्व परवानाधारकांनी मद्य विक्री करू नये, अशा सुचना राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी दिल्या आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवार मतदारांना दारूच्या पार्टीचे आमिष दाखवत असतात. त्यामुळे या कालावधीत दारूची जास्तीत-जास्त विक्री होत असते.
महाराष्ट्राबरोबर हरियाणामध्येदेखील विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे याठिकाणीही ड्राय डे असणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण ८ ड्राय डे जाहीर करण्यात आले आहेत. यात काही ड्राय डे सणांमुळे तर काही विधानसभा निवडणुकांमुळे जाहीर करण्यात आले आहेत. या महिन्यातील 'ड्राय डे'मुळे तळीरामांना त्रास सहन करावा लागणार आहे.