
महाराष्ट्रातील (Maharashtra) राज्यात लवकरच 'ड्राय डे' (Dry Day) ठेवण्यात येणाऱ्या दिवसांच्या संख्येत घट होणार आहे. तर मद्यपींसाठी ही आनंदाची बातमी असून त्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली असून ते याबद्दल कार्य करणार आहेत. तसेच समितीने अहवाल जाहीर केल्यानंतर राज्यात सर्वत्र ड्राय डे करिता समान धोरण असणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.
सध्या राज्यात सणानुसार ड्राय डे जाहीर केला जातो. त्याचसोबत विविध जिल्ह्यात सण-उत्सवावेळी ड्राय डे निमित्त दारुची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येतात. परंतु काही ठिकाणी ड्राय डे असल्याचे कारण देत दारुची दुकाने बंद करण्यात येतात. त्यामुळेच राज्यातील ड्राय डे संदर्भातील धोरणात सुस्पष्टता आणि सुसूत्रा येण्यासाठी सरकारकडून या समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार हे फक्त जिल्हाधिकाऱ्यांना असतात. मात्र संपूर्ण राज्यात ड्राय डे करिता समान धोरण कशा पद्धतीने राबता येईल त्याबद्दल सरकारकडून विचार केला जात आहे.