Accident (PC - File Photo)

Hydrabad Bus Accident: पणजीहून (Panji) हैद्राबादला (Hydrabad) जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघतात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाले आहे. बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बस चालकाचा गाडी वरील नियत्रंण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्याच्यावर शासकिय रुग्णालयता उपचार सुरु आहे. धारबांदोडा येथे अपघात झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून हैद्राबादला जात असताना एका खासगी बसचा अपघात झाला. बस वरून बस चालकाचं नियत्रंण सुटलं आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या बसमध्ये उपस्थित २३ प्रवाशी जखमी झाले. आणखी दोन चालक होते ते देखील जखमी झाले. अपघातानंतर जखमी लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केला स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतला.

जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. प्रवाशांना बाहेर काढले आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  बसमधील ९ जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.  पणजीतील बांबोळी येथील गोमेकॉ या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी बसचालकाचा अपघाती मृत्यू झाल्यांची नोंद घेतली आहे.