Raj Thackeray (Photo Credit: MNS)

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार (Global Teacher Prize 202 0) सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारानंतर दिग्गजांकडून डिसले गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. नुकतीच रणजीत सिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि रणजीत सिंह डिसले यांच्यात शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, रणजीतसिंह डिसले गुरुजींनी दाखवलेल्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे डिसले यांनी जाहीर केले आहे. याबाबत राज ठाकरे म्हणाले की “डिसले गुरुजींनी दाखवलेल्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान जगात उंचावली आहे” दरम्यान डिसले गुरुजी यांना राज ठाकरे यांची शिक्षण क्षेत्राबाबत असलेली आवड चांगली वाटली आहे. महाराष्ट्राचे नाव शिक्षण क्षेत्रात आणखी उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही डिसले यांनी स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा- Bharat Bandh: बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भारत बंदच्या पार्श्वभुमीवर रेल्वे रोको आंदोलन

ट्विट-

‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या सुपुत्री आणि स्टुडन्ट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी केली आहे. डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.