Pune Suicide Case: प्रियकराच्या दुसऱ्या अफेअरमुळे धक्का, प्रेयसीची नैराश्येतून आत्महत्या; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Pune Suicide Case: पुण्यातील पिंपरी चिचंवड येथील एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवले आहे. प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणीने गळफास घेतला आहे. ही घटना 2023च्या ऑक्टोबर महिन्यात घडली. हिंजवडी येथील आयआयएमएस कॉलेजच्या मुलींच्या डेल्डा हॉस्टेलमध्ये घडली. या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- घरच्यांनी प्रेमाचा केला विरोध, प्रेमयुगलांनी उचलले टोकाचे पाऊल, वर्धा येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील कॉलेजात शिकणारी गुडीया कुमारी (वय वर्ष 25) हीनं आत्महत्या केले. अश्वीन भारद्वार असं प्रियकराच नाव आहे. अश्विन बिहार येथील रहिवाशी आहे. अश्विनवर आयपीसीद्वार 306नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अश्विन आणि गुडियाचं अफ्रेअर होत. त्यानंतर दोघांन्ही ब्रेकअप केल. तक्रारादारनुसार, अश्विन गुडीयाला अपमानास्पद वागणूक देत होता. त्याच दुसऱ्या मुलीशी अफ्रेअर होत असल्याचे त्यांना समजलं. या गोष्टीला कंटाळून गुडीयाने आत्महत्या करण्या सारखं टोकाचं पाऊल उचललं. या बाबत मयत मुलीच्या वडिलांनी रविवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अश्विनवर गुन्हा दाखल केला.

मृत तरुणीचे वडिल भोलासिंग परमात्मा प्रसाद सिंग यांनी पुण्यातील पोलिस ठाण्यात तक्रार केली की, अश्विन गुडीला नेहमी अपमानास्पद बोलायचा, तिचा तिरस्कार करायचा. तू मरून जा मला काही फरक पडत नाही असं म्हणायचा. त्यामुळे गुडीला नैराश्यात गेली होती. या गोष्टीतून तिला मानसिक त्रास होऊ लागला. त्यामुळे गुडीयाने टोकाचं पाऊल उचलले. गुडीयाने राहत्या हॉस्टेलमध्ये छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली. पुणे पोलिस याबाबत चौकशी करत आहे.