प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कानपूर एन्काउंटर प्रकरणातील फरार झालेला आरोपी मुंबई पर्यंत पोहचल्याची बाब शनिवारी समोर आली. तर या प्रकरणातील एक आरोपी अरविंद त्रिवेदी याच्यासह त्याच्या ड्रायव्हरला एटीएस जुहू युनिट कडून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आता अरविंद त्रिवेदीयाच्यासह ड्रायव्हरला येत्या 21 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी ठाणे कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे. एटीएस पथकाला या आरोपीबद्दल ठाणे येथे असल्याची टीप मिळाली असता त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले होते.(Vikas Dubey Encounter: गुन्हेगारीचं राजकारण करु नये, विकास दुबे पोलीस एन्काऊंटर प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया)

मध्य प्रदेशात 8 पोलिसांवर गोळीबार करुन कुख्यात विकास दुबे फरार झाला होता. याच्या शोधासाठी पोलिसांनी सर्वत्र सर्च ऑपरेशन सुरु केले होते. तसेच विकास दुबे याच्यासह अरविंद याने सुद्धा या प्रकरणानंतर पळ काढला होता. अरविंद हा ठाण्यात लपण्यासाठी जागा शोधत असल्याची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे.(ठाणे: Kanpur Encounter Case मधील विकास दुबे चा साथीदार अरविंद सोबत त्याचा ड्रायव्हरला मुंबईच्या ATS Juhu Unit कडून अटक)

दरम्यान, 10 जुलैला कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. मध्यप्रदेशात उज्जैनमध्ये महाकाली मंदिराजवळ त्याला अटक करण्यात आल्यानंतर कानपूरमध्ये पोलिस व्हॅन मधून आणताना ती गाडी पलटी झाली. तेव्हा पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात विकास दुबेच्या छातीवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये 8 पोलिसांचा एन्काऊंटर करण्याचा आरोप विकास दुबेवर होता. तसेच 60 हून अधिक गुन्हे त्याच्यावर आहेत.