कानपूर एन्काऊंटर केस प्रकरणातील एक वॉन्टेट आरोपीला मुंबईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. ATS Juhu Unit ने ही कामगिरी केली असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएस पथकाकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज (11जुलै) दिवशी एटीएस जुहू पथकाला त्या आरोपीबद्दल टीप मिळाली. तो ठाण्यामध्ये असल्याची माहिती मिळताच एटीएस जुहू युनिट कडून कोलशेत रोड ठाणे येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या सापळ्यात वॉन्टेड आरोपी अरविंद आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारी अडकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान 2, 3 जुलैच्या मध्यरात्री कुख्यात गुंड विकास दुबे याच्या अटकेसाठी पोलिस गेले असताना त्यांच्यावर हल्ला करून विकास दुबे आणि त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यापैकी एक अरविंद हा होता. त्याच्यावर भाजपा नेते संतोष शुक्ला यांच्या हत्येमध्ये विकास दुबे सोबत सहभाग असल्याचंही प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. अरविंद 46 वर्षीय असून त्याचा ड्रायव्हर 30 वर्षीय आहे. विकास दुबेच्या शोधासाठी पोलिसांकडून देशभर सर्च वॉरेंट होते. तसेच रोख रक्कमेचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
ATS कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुहू पथकाने पोलिस इन्स्पेक्टर दया नायक यांच्या नेतृत्त्वाखाली ही कामगिरी केली आहे. ठाण्यामध्ये सापळा रचून विकास दुबेच्या साथीदारांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. Vikas Dubey Encounter: गुन्हेगारीचं राजकारण करु नये, विकास दुबे पोलीस एन्काऊंटर प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.
ANI Tweet
On 11 July, ATS Juhu Unit, Mumbai received a tipoff that one accused in #KanpurEncounter case has been in Thane in search of a hide-out. ATS Juhu Unit laid a trap at Kolshet Road, Thane & nabbed wanted accused Arvind&his driver Sonu Tiwari: Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) pic.twitter.com/bWf564UVjY
— ANI (@ANI) July 11, 2020
काल कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. मध्यप्रदेशात उज्जैनमध्ये महाकाली मंदिराजवळ त्याला अटक करण्यात आल्यानंतर कानपूरमध्ये पोलिस व्हॅन मधून आणताना ती गाडी पलटी झाली. तेव्हा पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात विकास दुबेच्या छातीवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये 8 पोलिसांचा एन्काऊंटर करण्याचा आरोप विकास दुबेवर होता. तसेच 60 हून अधिक गुन्हे त्याच्यावर आहेत.