शेगावचे गजानन महाराज (Gajanan Maharaj Revealed) हे अनेकांचे श्रद्धास्थान. राज्य आणि देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होता. अख्यायिका आहे की, महाराज प्रकटले आणि त्यांनी अनेकांना दर्शन दिले. आजच्या काळात जर कोणी दावा केला की, महाराज पुन्हा एकदा खरोखच प्रकटले आहेत, तर? बसेल विश्वास? पण, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Buldhana News) येथून अशीच एक बातमी आली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या ठिकाणी म्हणे गजानन महाराज आवतरले. महाराजांसारखी दिसणारी आणि तशीच वेशभुषा आणि बसण्याची शैली आत्मसात केलेली एक व्यक्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. महाराजांप्रती असलेले साम्य पाहून अनेक देवभोळ्या भक्तांनी त्यांच्या दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यन, अचानक ही व्यक्ती पुन्हा गायबही झाली. त्यामुळे लोकांच्या चर्चांना पुन्हा उधान आले.
गजानन महाराज यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी ही व्यक्ती काही वेळासाठीच खामगावात दाखल झाली. त्यानंतर जवळपास तीन तासांनी ही व्यक्ती निघूनही गेली. त्यामुळे ही व्यक्ती आहे तरी कोण? याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान, ही व्यक्ती आपली ओळख सांगत नाही. मात्र, तिच्याकडे एक बँक पासबूक सापडले आहे. त्यावर शेषराव रामराव बिराजदार असे नाव आहे. बिराजदार हे लातूर जिल्ह्यात असलेल्या शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घुगगी सांगवी येथील रहिवासी आहेत. मात्र, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार घुगगी सांगवी गावच्या पोलीस पाटलांनी वेगळीच माहिती दिली.
घुगगी सांगवी गावच्या पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, शेषराव बिराजदार हे या गावचे रहिवासी आहेत. मात्र, आता ते गावात नसतात. पाठिमागील अनेक वर्षांपासून त्यांचा गावशी संपर्क नाही. गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन होती. मात्र, तीसुद्धा त्यांनी आपल्या भावाला विकली आहे. त्यामुळे त्यांचा गावशी फार संपर्क नसतो. कधीतरीच येणेजाणे असते. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. मात्र, ते पत्नीसोबत राहात नाहीत. त्यांना धार्मिक स्थळांना भेटी देण्याची आवड आहे. परंतू, फोटोमध्ये जे दिसत आहेत ते बिराजदार नाहीत. ही कोणीतरी वेगळीच व्यक्ती आहे,असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गजानन महाराज यांच्यासारखी दिसणारी ही व्यक्ती त्यांच्यासारखाच पोषाख करते. इतकेच नव्हे तर ती त्यांच्यासारखीच पोझ घेते. कधीही कोणाच्या घरी जाते आणि जेवण करायचे आहे म्हणते. दुसऱ्या बाजूला ही व्यक्ती चौक, रस्ता, महामार्ग येथे कुठेही बसते. एकदा तर ही व्यक्ती महामार्गावरील दुभाजकावर जाऊन बसली होती. ज्यामुळे पोलिसांना कारवाई करुन तिला बाजूला करावे लागल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.