Gan Gan Ganat Bote: महाराष्ट्रातील बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) या गावी वयाच्या विसाव्या वर्षी गजानन महाराज प्रकट झाल्याचे सांगितले जाते. ते ज्या दिवशी दिसतेल तो दिवस गजानन महाराज प्रकट दिन (Gajanan Maharaj Prakat Din) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शेगावच्या गजानन मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. महाराजांना वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्याही विविध भागांतून लोक येतात. शेगावातच नव्हे तर महाराजांचे मठ असलेल्या राज्यातील विविध ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन (Gajanan Maharaj Prakat Din 2023 Wishes) केले जाते. ग्रेगोरियान कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारी 1878 रोजी गजानन महाराजांचे दर्शन झाले असे सांगितले जाते. गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येथे काही HD Images, Wallpapers, Greetings देत आहोत. ज्या आपण सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) वरुन शेअर करुन भक्तांचा दिवस मंगलमय करु शकता.
गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे (Paduka) पूजन केल्या जातात. महाराजांच्या प्रकट दिनी हजारो भक्त, लोक शेगाव येथे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावतात. हे सर्व भाविक पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान यांमध्ये विशेष सहभाग नोंदवतात.महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो.
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा
गण गण गणात बोते
गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा
गजानन महाराजांचा 'गण गण गणात बोते' हा मंत्र प्रसिद्ध आहे. या मंत्राचा तो अखंड जप करत असत. या मंत्रावरुनच त्यांना 'गजानन महाराज' म्हणून ओळखले जाऊ लागल्याचे सांगतात. त्यांना 'शेगावीचे संत' म्हणूनही ओळखले जाते.
गण गण गणात बोते
श्री गजानन महाराज यांचे जीवन आणि त्यांच्या जीनातील विविध पैलू 'श्री गजानन विजय ग्रंथ' आपल्याला पाहायला मिळतात. हा ग्रंध दास गानू यांनी लिहिले आहे. हे पुस्तक दास गानू ( Das Ganu) यांनी लिहिले आहे. सांगितले आणि मानले जाते की श्री गजानन महाराज यांनी त्यांच्या हायातीत असंख्य चमत्कार केले. त्यांनी गरजू आणि गरबी लोकांना मदत केली. त्याच्या चमत्कारांनी गर्विष्ठ आणि अहंकारी लोकांना अद्दल घडली. हे लोक सदमार्गावर चालू लागल्याचेही सांगितले जाते.