Friendship Day 2019: मैत्रीदिनी अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र फडणवीस यांना हटके अंदाजात शुभेच्छा
अमृता आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

ऑगस्ट महीन्याचा पहिला रविवार हा सर्वत्र फ्रेंडशिप डे (Friendship Day) किंवा मैत्रीदिन म्हणून साजरा केला होता. आपल्या कुटुंबानंतर आपल्या आयुष्यातील चढ-उतारांमध्ये, चांगल्या वाईट काळामध्ये आपल्याला साथ देतात ते आपले मित्र. अशा मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मैत्री कोणाशी करावी याचा काही नियम नाही, त्यामुळे तुम्ही आपल्या जोडीदारातही मित्र पाहू शकता. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनाही असेच वाटत असावे, म्हणून त्यांनी आजच्या दिवशी आपले पती, मित्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एक ट्विट करत अमृता यांनी आपल्याला आपल्या मित्राबद्दल काय वाटते ते सांगितले आहे. त्या म्हणतात, ‘माझ्या पुढे चालू नको - मी कदाचित अनुसरण करू शकणार नाही! माझ्यामागे चालू नको - मी कदाचित पुढे जाऊ शकत नाही! तू फक्त माझ्या सोबत चालत राहा आणि नेहमी असाच माझा मित्र बनून राहा.’ ही पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काही फोटोही शेअर केले आहेत.

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा जशी राजकीय वर्तुळात रंगत असते, तशीच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची चर्चा संगीत क्षेत्रात होत असते. अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका आहेत हे आपण याआधी अनेकवेळा पाहिले आहे. त्यांचा फॅशन सेन्सही उत्तम आहे. अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्या हिरारीने भाग घेत असतात. या सर्वात त्यांना मदत, आधार, पाठींबा मिळतो तो त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांचा. देवेंद्रजीही अमृता यांना आपली पत्नी न मानता आपली मैत्रीण मानतात म्हणूनच आज अमृता यांचीही एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.