फोटो सौजन्य - फेसबुक

विकेंड (Weekend) आणि थंडीचे वातावरण झाल्याने दारुड्यांमध्ये बियर(Beer) किंवा रम (Rum) पिण्याचे प्रमाण वाढते. तर काही लोक ऑनलाईन पद्धतीने दारुची ऑर्डर देऊन घरीच दारु पिण्याचा बेत आखतात. मात्र काही ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने दारुची ऑर्डर देऊन ही त्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे.

काही ग्राहकांनी ऐन थंडीच्या दिवसात घरीच दारु पिण्यचा बेत आखत आहे. त्यामुळे ते ऑनलाईन पद्धतीने दारुची खरेदी करण्यास पसंद करत आहेत. मात्र काही चोर इंटरनेटचा गैर वापर करुन ऑनलाईन पद्धतीने मिळणाऱ्या दारुच्या दुकानाची संपूर्ण माहिती चोरत आहेत. त्याचबरोबर ज्या ग्राहकाने ऑनलाईन पद्धतीने दारु मागवली आहे त्यांना दारुच्या दुकानासह स्वत:चा मोबाईल नंबर देत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊन ही दारु घरपोच आली नसल्याचा प्रकार सध्या उघडकीस येत आहे.

या प्रकरणी मुंबईतल्या बांद्रा, सांताक्रुझ, चेंबुर आणि घाटकोपर या ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांची ऑनलाईन पद्धतीने दारु मागवल्याने फसवणुक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र वाईन मर्चेंट असोशिएशनने याबबात अधिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.