Fire At Hardware Shop in Pune (PC - Twitter/ANI)

Fire At Hardware Shop in Pune: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील इलेक्ट्रिक हार्डवेअरच्या दुकानाला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत (Fire) दोन अल्पवयीन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. चिमनाराम चौधरी (वय, 48), नम्रता चिमनाराम चौधरी (वय,40), भावेश चौधरी (वय,15) आणि सचिन चौधरी (वय,13) अशी मृतांची नावे आहेत.

एजन्सीच्या वृत्तानुसार, शहरातील चिखली भागातील पूर्णा नगर येथील निवासी इमारतीच्या पूजा हाईट्स-च्या तळमजल्यावरील दुकानात ही घटना पहाटे 5.25 वाजता घडली. अग्निशमन विभागातील एका अधिकाऱ्याने पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे की, आग लागली तेव्हा चार जणांचे कुटुंब दुकानात झोपले होते. (हेही वाचा - Nitesh Rane On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे, संजय राऊत पाकिस्तानी एजंट आहेत का? नितेश राणेंचा UBT शिवसेना गटाला सवाल)

आतापर्यंत, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हार्डवेअर दुकानात झोपलेल्या चार लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यासंदर्भात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. आग विझवण्यात आली असून कूलिंगची प्रक्रिया सुरू आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. मात्र, या घटनेची चौकशी सुरू आहे.