Sanjay Pandey Will Contest Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा (Vidhansabha) निवडणूकांची घोषणा लवकरच होईल. एकीकडे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर वेगवेगळ्या पक्षाच्यावतीने जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार याची घोषणा करत आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील माजी आयुक्त राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे. ( हेही वाचा- सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक; सोशल मीडियावर दिली माहिती)
माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून माहिती दिली की, ते विधानसभा निवडणूक लढणार आहे. वर्सोवा विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबाबत कोणतीही माहिती नाही. फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या पक्षाचा किंवा मतदार संघाचा उल्लेख केला नाही.
Sanjay Pandey | संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात | Marathi News
समाजमाध्यमावर स्वतःच केली घोषणा
पांडे हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त #SanjayPandey #VidhanSabha #MumbaiPolice #Election2024 #PoliticalAnnouncement #Jaimaharashtranews #Marathinews #Maharashtra pic.twitter.com/2YGnIV4qCf
— Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) August 12, 2024
फेसबूकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण प्रयत्न करू ' पोस्टसोबत त्यांनी मंदिरातला फोटो देखील शेअर केला आहे. ही निवडणूक कोणाविरुध्द लढणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.