Supriya Sule Phone And WhatsApp Hacked: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक (WhatsApp Hacked) झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी याबाबत ट्विट करत त्यांचा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले असून कॉल किंवा एसएमएस पाठवू नका, असे आवाहन केले आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करताना सांगितलं आहे की, 'माझा फोन आणि व्हॉट्सॲप हॅक झाले आहेत. कृपया मला कॉल करू नका किंवा मजकूर पाठवू नका. मी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला आहे.'
सुप्रिया सुळे यांची X वरील पोस्ट -
*** अत्यंत महत्वाचे ***
माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. - सुप्रिया सुळे
— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)