केंद्रीय राज्यमंत्री आणि जेष्ठ भाजप नेते रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे जावई हर्षवर्धन जाधव ( Harshwardhan Jadhav) यांना पुणे (Pune) येथून अटक करण्यात आली आहे. हत्येच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि इशा झा नावाच्या महिलेविरोधात चतुःशृंगी पोलीस ठाणे दप्तरी गुन्हा नोंद होता. अमन चड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
या प्रकरणासंबंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमन चड्डा हे सोमवारी सकाळी आपल्या आई वडीलांना घेऊन ब्रेमन चौकाकडे निघाले होते. या वेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे दोघे रस्त्याकडेला कारमध्ये बसले होते. दरम्यान, त्यांनी कारचा दरवाजा अचानक उखडला. त्यामुळे चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. याबातब चड्डा यांनी जाधव आणि झा यांना जाब विचारला असता दोघांनी चड्डा आणि त्यांच्या वडीलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण सुरु असताना चड्डा यांनी आपले वडील हृदयाचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे असे सांगितले. परंतू, हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्यासोबतच्या महिलेने चड्डा यांच्या वडीलांना मारहाण सुरुच ठेवली. त्यानंतर या दोघांनी मिळून अमन चड्डा यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दिली. प्रात्त फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (हेही वाचा, Pune: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल)
दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी हर्षवर्धन जाधव यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.