Ramkrushna Baba Patil | (File Photo)

माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील (Former Congress MP Ramkrushna Baba Patil Passed Away) यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. बुधवारी (2 ऑगस्ट 2020) सकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी लोकसभेवर प्रतिनिधीत्व केले होते. वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात अप्पासाहेब पाटील, वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील ही दोन मुले असा परिवार आहे.

माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील ( Ramkrushna Baba Patil ) यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. त्यानी औरंगाबात तालुक्यातील दहेगाव येथून आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. 1970 मध्ये ते पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडूण आले. पुढे त्यांची राजकीय कारकीर्द वाढत गेली. 1985 मध्ये ते वैजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले.

काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर सन 1985 ते 1995 पर्यंत रामकृष्ण बाबा पाटील यांनी आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. पुढे 1999 मध्ये काँग्रेसने त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली. लोकसभा निवडणूक 1999 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला. (हेही वाचा, माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी यांचे निधन)

वैजापूर पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन (25 वर्षे), मुंबई महाराष्ट्र स्टेट कॉप-अप बँक चेअरमन, सरपंच, आमदार, खासदार अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले. अनेक ठिकाणी कार्यकाळ पूर्ण केला. काही ठिकाणी प्रदीर्घ काळ महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.