माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते- अनिल गोटे
अनिल गोटे (File Photo)

नुकतेच भाजपमधून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress Party) पक्षात प्रवेश केल्याले नेते अनिल गोटे (Anil Gote) यांनी माजी मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल गोटे यांची नुकतीच शिरपूर (Shirpur) येथे सभा पार पडली. दरम्यान ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याइतका लबाड आणि खोटारडा माणूस या जगाच्या पाठीवर सापडणार नाही, असा आरोप त्यांनी त्यावेळी केला. तसेच फडणवीस हे कोणाशीच खरे बोलत नाहीत, असेही अनिल गोटे त्यांच्या सभेत म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नंतर राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या. यातच महाविकास आघाडीचे सरकार येताच अनिल गोटे यांनी गेल्या महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नुकतीच शिरपूर येथे अनिल गोटे यांची सभा पार पडली. या सभेत अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला आहे. दरम्यान, अनिल गोटे म्हणाले की, फडणवीस कोणाशीही खरे बोलत नाहीत. मी एकदा त्यांना पत्र लिहिले, देवेंद्रजी तुम्ही एक तरी दिवस खरे बोललेले सांगा. म्हणजे तो मला तो दिवस साजरा करता येईल. अमृता वहिनींना तरी ते खरे बोलतात का हे विचारावे लागेल. तसेच फडणवीसांनी धनगरांनाही फसवल्याचा आरोप त्यांनी केला. (हे देखील वाचा- राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल झाले पाहिजेत- रणजित सावरकर)

अनिल गोटे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. अनिल गोटे यांचे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि राज्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे गोटे यांनी आपला स्वतंत्र गट या निवडणुकीसाठी उतरवला होता. तसेच नंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थीही केली होती. परंतु, त्यानंतरही अनिल गोटे यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.