Former BJP MLA Narendra Mehta | (Photo Credits: Facebook)

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. काही मंडळींनी मेहता यांचा राजीनामा भाजपला धक्का वैगेरे असल्याचेही म्हटले होते. दरम्यान, मेहता यांच्या राजीनाम्यानंतर वेगळ्याच गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे. नरेंद्र मेहता यांची अश्लिल चित्रफित समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्यानेच त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी या चर्चांबाबत वृत्त दिले आहे.

भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी ही चित्रफित आपणच काढली आहे. मात्र, भाजपतील वरिष्ठ किंवा त्यांच्याच वर्तुळातील निकटवर्तीयांनकडून ती प्रसारमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप केल्याचे लोकसत्ता डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मीरा-भाईंद महानगरपालिका महापौरपद निवडणूक आज (26 फेब्रुवारी) पार पडत आहे. या निवडणुकीदरम्यान पक्षातील गट आणि नेत्यांसोबत काही वाद निर्माण झाल्याने मेहता यांनी भाजपतील विविध पदांचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, मेहता यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर होताच काही तासांमध्येच त्यांची अश्लिल चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (हेही वाचा, Nude Cleaning Business: 3 मुलांची आई असलेली महिला विवस्त्र राहून करते घरकाम करण्याचा नवा व्यवसाय, तासाचे घेते 'इतके' रुपये)

दरम्यान, भाजप नगरसेविका नीला सोन्स यांनी नरेंद्र मेहता यांच्यापासून आपल्याला आणि आपल्या मुलाच्या जीवाला धोका असल्याची तक्रार ठाणे विभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल केली आहे. मेहता यांची चित्रफीत आपणच काढली आहे. ती वरिष्ठांना सूपूर्त केली होती. मात्र, ती त्यांनी (वरिष्ठ) किंवा त्यांच्याच निकटवर्तीयांपैकी कोणीतरी समाजमाध्यांतून प्रसारीत केली असावी, असा आरोप नगरसेविका सोन्स यांनी केला आहे.